Tuesday, February 2, 2010

माझे पुस्तक

अनेक उत्तम विचार मनात माझ्या येतात
कल्पनेच्या घिरट्या मनात घालू लागतात
किती तरी गोष्टी रचणार होतो मी
पुस्तकावर पुस्तके लिहिणार होतो मी

आज आयुष्याचे पान आणखी एक गळले
काही झाले, काही केले, बरेच कळले, बरेच वळले
पुन्हा ते पान लिहायला घेईन म्हणतो
आणखी छान समजून, पुन्हा लिहीन म्हणतो!

जीवनाच्या पुस्तकाच लिखाणच अजब असतं
एकदा लिहून झाल्यावर संपादन करायच नसतं
एक अक्षर म्हणजे एक पाडाव वाटेल इथला
लिहून झाल्यावर अनेकदा मात्र वाचता येईल तुला

इतिहासातल्या पानांवर आता विचार कशाला
झाले गेले संपले आता दे आकार भविष्याला
कर्माच्या लेखणीने एक एक पान लिही ना तू
जीवनाच्या पुस्तकाची मनपसंत रचना कर ना तू

No comments: