Tuesday, January 20, 2009

मुखवट्यातील देवदूत An Angel in Disguise by T.S. Arthur

टीमोथे शाय आर्थर (६जून १८०९ - मार्च १८८५) हे १९ व्या शतकातील लोकप्रिय अमेरिकन लेखक होते. ते आपल्या संयमित लिखानासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या Ten Nights In a Bar Room आणि What I Saw There ह्या कादंबऱ्या खुप लोकप्रिय झाल्या.

त्यांच्या "मुखवट्यातील देवदूत" ह्या कथेचे स्वैर रुपांतर

आळस, सुस्ती, अनेक दुर्गुण, अनैतीक वर्तन व असंयम यांनी अखेर आपला दुःखी परिणाम साधला होता, आणि ती मरण पावलेल्या त्या मातेचा थंड पडलेला देह तिच्या दीन मुलांमध्ये निश्चलपणे पडला होता. तिच्याच उंबरठ्यावर मद्यधुंद अवस्थेत पडून तिच्या भेदरलेल्या मुलांसमक्ष ती मृत्यूमुखी पडली होती.
मृत्यू आपल्यातल्या माणुसकीचा वसंत जागा करतो म्हणतात. गावातील जवळपास प्रत्येक स्त्री, पुरुष व मुलाने त्या स्त्रीचा तिरस्कार, उपहास व राग केला होता. पण आता तिच्या मृत्यूची बातमी हळुहळु हलक्या स्वरात सर्वत्र पसरली होती. उघडपणे केलेल्या दोषारोपणाची जागा दयेने घेतली होती. ऊन, वारा व पावसापासुन संरक्षण मिळण्यासाठी तिने बांधलेल्या जुन्या पडक्या झोपडीकडे शेजारीपाजारी घाईघाईने गेले: काही मृतदेहाचे व्यवस्थित दफन करण्यासाठी कापड घेऊन तर काही तिन अर्धपोटी मुलांसाठी अन्न घेऊन.

ह्यांपैकी बारा वर्षिय जॉन आपली उपजिवीका निभावण्यासाठी कुठल्याही शेतकऱ्याकडे कामाला राहण्याजोगे होता. दहा अकरा वर्षाची केट हुशार व कार्यक्षम मुलगी होती की जी चांगल्या लोकांच्या सहवासात राहील्यास काहीतरी करुन दाखवू शकली असती. पण सर्वांत लहान गरीब बिचारी मॅज्जी एका असाध्या रोगाने ग्रस्त होती. दोन वर्षापूर्वी खिडकीतून पडल्यामुळे तीचा पाठीचा कणा जखमी झाला होता. तेंव्हा पासुन आईने आपल्या बाहुत घेतल्याशिवाय ती अंथरूण सोडू शकली नव्हती.

"ह्या मुलांचे काय करायचे?" हा आता सर्वात महत्वाचा प्रश्न होता. मेलेली माता आता पुरली जाणार होती आणि तो गावकऱ्यांच्या काळजी पलिकडचा तो भाग होता. पण उपासमारीसाठी ती सोडली जाऊ शकत नव्हती. हे सर्व लक्षात घेऊन व आपल्या पत्नीशी बोलून जोन्स नावाचा एक शेतकरी म्हणाला की जॉनची आई आता नसल्यामुळे तो जॉनची जवाबदारी घेण्यास तयार आहे. श्रीमती एलीस घरकामासाठी एका मुलीच्या शोधात होत्या. त्यांनी ठरवले की कॅटी जरी त्या कामासाठी अजून खुप लहान असली तरी तिला निवडणे म्हणजे त्यांनी धार्मदाय काम केल्याप्रमाणेच होईल.

"मी मॅगीची जवाबदारी घेतो" असे कोणीच म्ह्टले नाही. दयेच्या अनेक नजरा त्या दीन आणि खंगलेल्या मुलीवर खिळून राहील्या आणि अनेकांनी तिच्या बद्दल काळजी बोलून दाखवली. आयांनी तिच्यासाठी चांगले कपडे आणले व तिचे जिर्ण व मळके कपडे काढले. पण तिला नेण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. अंथरूणास खिळलेले मुल कोणास हवे होते?
"तिला अनाथालयात न्या" एक उर्मट माणूस म्हणाला. "मॅग्गीचे काय करायचे ?" असे त्याला विचारले गेले होते. "कोणालाच तिची काळजी नाही."
"अनाथालय म्हणजे गरीब व असहाय्य मुलांसाठी वाईट जागा आहे." कुणितरी बोलाले.
"तुमची असो किंवा माझी मुले", आणखी एक जण शांतपणे बोलला," व्रात्य मुलांसाठी हा चांगला बदल असेल, त्यांची स्वच्छता, चांगले अन्न पाणी, औषधीची व्यवस्था हे सर्व म्हणजे तिच्या आधीच्या परिस्थीतीपेक्षा चांगलेच असणार आहे."

मुद्दा बरोबर होता पण मनाला पटण्यासारखे ते नव्हते. मृत्यू नंतरचा दुसरा दिवस म्हणजे मृतशरिरास पुरण्याचा दिवस . त्या दयनिय झोपडीत काही शेजारी पाजारी गोळा झाले पण स्मशाना पर्यंत कुणी गेले नाही. तिला पुरल्यानंतर जोन्सने जॉनला आपल्या गाडीत बसवले आणि आपले काम आपण केले या भावनेत तो गाडी घेऊन निघून गेला.

"तिला अशा प्रकारे सोडणे म्हणजे अतिशय निर्दयीपणा आहे."वेगाने पुढे येवून व जो ला बाजुला सारुन लोहाराची बायको म्हणाली,"मग तिला अनाथालायात न्या. तिला तेथे जावे लागेल."

तो थोड्यावेळासाठी विचार करत उभा राहीला; तो मागे वळला व पुन्हा झोपडीत शिरला. अतिशय क्लेषाने मॅज्जी स्वतःहूनच उठली व पलंगावर बसून राहिली होती.
तिचे डोळे दाराकडे लागले होते जेथुन सर्व लोक आताच बाहेर गेले होते. तिच्या बारीक पांढऱ्या चेहऱ्यावर एक अनामिक भिती पसरली होती.

"अरे थमसन काका!" ती ओरडली, एक आवंढा घेऊन ती म्हणाली, "मला येथे असे एकटे सोडून जाऊ नका!"
बाहेरुन कोरडा वाटत असला तरी जो थोमसन ला एक हृदय होते व त्यात ओलावा देखील होता. त्यांना मुले आवडत होती, आणि त्याच्या दुकानात ती आल्यावर त्याला
आनंद वाटायचा.
"नाही बेटा," पलंगाकडे जाऊन त्या मुली जवळ थांबत तो प्रेंमळपणे उत्तरला,"तूला इथे एकाटे सोडले जाणार नाही." नंतर त्याने तिला शेजाऱ्यांनी आणलेल्या एका
स्वच्छ चादरीत एखाद्या स्त्रीच्याच मायेने गुंडाळून घेतले. तिला त्याच्या घेरेदार बाहूत उचलून घेत त्याने तिला बाहेरील आणि झोपडी व त्याचे घर या दरम्यान
असणाऱ्या शेतात आणले.
आता, जोची निपुत्रीक पत्नी काही विषेश थोर विचार करणारी नव्हती, किंवा इतरांच्या आनंदासाठी त्याग करण्याची तिची वृत्ती नव्हती. घरी गेल्यावर होणाऱ्या स्वागताची
जो ला चांगलीच जाणीव होती. श्रीमती थोमसन खिडकितुन बघत होत्या, जो झपाझप पावले टाकत घराकडे आला व घरासमोरील बागेचे दार उघडून घरात शीरला.
तो एक मौल्यवाने ओझे वाहत होता आणि हे त्याला चांगलेच ठाऊक होते. दोन्ही हातांनी छातीशी धरलेल्या त्या मुलीच्या मनातील प्रेमभावना त्याच्या ऱ्हूदयापर्यंत पोचल्या
होत्या. त्या दोघांमध्ये एक बंधन तयार झाले होते, प्रेमाचा झरा एका जीवास जन्म देत होता.
"हे तुझ्याकडे काय आहे?" श्रीमती थोमसनने खोचकपणे विचारले.
जो ला ते मुल आणखिनच दडुन बसल्यासारखे जो जाणवले. अर्जव आणि काळजीचा कटाक्ष टाकण्याशिवाय त्याने काहीच उत्तर दिले नाही. कटाक्ष निर्देश करत होता की
स्पष्टीकरणासाठी थोडे थांबा व व्यसस्थित वागा. आत जात त्याने मेग्गीला पहिल्या मजल्यावरील एका छोट्या खोलीत नेले व तिला एका पलंगावर झोपवले.
" तऊ त्या आजारी व्रात्य मुलीस तू घरी आणले नाहीस!" जो थोमसनच्या आवाजात राग व आश्चर्य व चेहरा क्रोधायमान झाला होता.
"मला असं वाटतं की स्त्रीयांची ऱ्हदये जरा कडकच असतात."जो म्हणाला. जो बहुदा त्याच्या बायकोच्या तोंडी लागत नसे किंवा ती एखाद्या मुद्द्यावरून
चिडल्यावर अत्यंत शांत राहणे किंवा वाद न घालण्याचाअ पवित्रा घेत असे.
वाद न करण्याच्या पावित्रा घेणे पसंद करत असे.....अपूर्ण

No comments: