Tuesday, March 31, 2009
Subscribe to:
Posts (Atom)
आयुष्यात आपल्या अनेक आठवणी असतात व त्या कधीतरी अचानकच आपल्या मनःपटलावर तरळतात. कुणाला एखादी कथा, एखादे पुस्तक, मोठ्यांना बालपण, श्रीमंतांना मेहनतीचे दिवस, शेतकऱ्यास एखादा हंगाम, प्रेमींना प्रेमाचे दिवस, कुणाला आपल्या आजी सोबतचे दिवस, तर कुणाला राना वनात घालवलेले बालपण असे प्रत्येकालाच आयुष्यातला कुठलातरी काळ हा सुगीच्या दिवसांप्रमाणेच वाटत असतो. मनुष्याचे एक बरे आहे की त्याला त्याच्या सुख दुःखाच्या आठवणी इतरांबरोबर वाटता येतात. त्याला तसे करणे आवडते. कदाचीत त्यामूळे थोडे हलके वाटत असावे!